सोलापूर : भैरवनाथ शुगरतर्फे लवंगी येथे यावर्षी ५१ व्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त व्हा. चेअरमन अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून कारखानास्थळी विविध देशी फळझाडांचे वृक्षारोपण कार्यक्रम झाला. यावेळी कामगारांनी प्लॅस्टिक वापर टाळण्यासंबंधी प्रतिज्ञा करण्यात आली. एकल प्लास्टिक वापर टाळा, सिंगल यूज प्लॅस्टिक बॅनर याविषयी कारखान्यातील सर्व कामगारांना महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने जारी केलेल्या मार्गदर्शन पत्रिकेचे वाचन करून माहिती देण्यात आली.
यावेळी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी शिवाजीराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या हस्ते विविध ५ झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली. व्हा. चेअरमन अनिल सावंत, प्र. जनरल मॅनेजर बाळासाहेब शिंदे, वर्क्स मॅनेजर नानासाहेब पोकळे, शेती अधिकारी कृष्णदेव लोंढे, चिफ अकाउंट पासले या सर्व मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कारखान्यातील सर्व खातेप्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कारखान्याचे ईटीपी विभागप्रमुख राहुल पवार, संजय खडतरे व सहकाऱ्यांनी संयोजन केले.