नवी दिल्ली : केंद्र सरकारने ३१ जानेवरी, २०२२ रोजी जारी केलेल्या अधिसुचनेनुसार अन्न मंत्रालयाने फेब्रुवारी २०२२ साठी देशातील ५६३ साखर कारखान्यांना साखर विक्रीसाठी २० लाख टनाचा कोटा मंजूर केला आहे.
यावेळी गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी साखर कोटा मंजूर केला आहे. अन्न मंत्रालयाने जानेवारी २०२२ साठी २१.५० लाख टन साखर विक्री कोटा मंजूर केला होता. दुसरीकडे फेब्रुवारी २०२१ च्या तुलनेत या महिन्यात जादा कोटा मंजूर केला आहे. सरकारने फेब्रुवारी २०२१ मध्ये १७ लाख टन कोटा दिला होता.
बाजारातील अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोटा अधिक आहे. मात्र, गेल्या फेब्रुवारीच्या तुलनेत विक्री सरासरीच्या जवळपास आहे. उद्योग आणि निर्यात अधिक निर्यातीच्या करारांमुळे वातावरण सकारात्मक आहे. त्यामुळे आगामी काही काळ किमती स्थिर राहतील अशी शक्यता आहे.
केंद्र सरकारने साखरेचा पुरवठा नियंत्रित ठेवण्यासाठी आणि दर स्थिर ठेवण्यासाठी मासिक कोटा पद्धती स्वीकारली आहे.