नवी दिल्ली : केंद्र सरकारने २९ जुलै २०२१ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार खाद्य मंत्रालयाने ऑगस्ट महिन्यासाठी देशातील ५५७ साखर कारखान्यांना विक्रीसाठी २१ लाख टनाचा विक्री कोटा जाहीर केला आहे.
या वेळी गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी साखर कोटा मंजुर केला आहे. खाद्य मंत्रालयाने जुलै २०२१ साठी २२ लाख टन साखर विक्री कोट्याला मंजुरी दिली होती. दुसरीकडे ऑगस्ट २०२० च्या तुलनेत यंदा जादा कोट्यास मंजुरी दिली आहे. सरकारने ऑगस्ट २०२० साठी २०.५० लाख टन कोट्यास मंजुरी दिली होती.
बाजारातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदू सणांच्या सुरुवातीस बाजारात चांगली मागणी पाहायला मिळू शकते. आणि साखरेच्या किमतींमध्ये ५० ते ६० रुपयांची तेजी येऊ शकते.
केंद्र सरकारने साखरेचा पुरवठा नियंत्रित राहावा आणि कर निर्धारणेच्या स्थिरतेसाठी मासिक कोटा मंजुरीची पद्धत लागू केली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link