नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अन्न मंत्रालयाने २८ ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी करून देशातील ५५८ साखर कारखान्यांना साखर विक्रीसाठी २२.५० लाख टनाचा कोटा मंजूर केला आहे. त्याशिवाय ऑक्टोबर २०२१ मध्ये विक्री न झालेला साखरेचा साठा विक्री करण्यासाठी तीस दिवसांची मुदतही देण्यात आली आहे.
या महिन्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी साखर साठा मंजूर झाला आहे. अन्न मंत्रालयाने ऑक्टोबर २०२१ साठी २४ लाख टन साखर विक्री कोटा मंजूर झाला आहे. दुसरीकडे नोव्हेंबर २०२० च्या तुलनेत यावेळी समान साखर कोटा देण्यात आला आहे. सरकारने नोव्हेंबर २०२० मध्ये २२.५० लाख टन साखरकोटा दिला होता.
बाजारातील तज्ज्ञांच्या मतानुसार, सणांमुळे वाढणाऱ्या मागणीनंतरही महाराष्ट्र आणि कर्नाटकातील साखर कारखान्यांकडून गाळप सुरू झाल्याने बाजारात साखर विक्रीवर दबाव दिसू शकतो. केंद्र सरकारने साखरेचा पुरवठा नियंत्रित करणे आणि दरात स्थिरतेसाठी मासिक साखर कोटा वितरण पद्धती अवलंबली आहे.