नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या खाद्य मंत्रालयाने ३० सप्टेंबर २०२१ रोजी एक अधिसूचना जारी करून ऑक्टोबर महिन्यासाठी देशभरातील ५५८ कारखान्यांना विक्रीसाठी २४ लाख टन कोटा मंजूर केला आहे. याशिवाय सप्टेंबर २०२१ या महिन्यातही विक्रीअभावी शिल्लक राहिलेल्या साखरेची विक्री करण्यासाठी ३० दिवसांची वाढीव मुदत देण्याची घोषणाही केंद्र सरकारने केली आहे.
या महिन्यात गेल्यावेळच्या तुलनेत जादा साखर कोटा मंजूर करण्यात आला आहे. खाद्य मंत्रालयाने सप्टेंबर २०२१ साठी २२ लाख टन साखर कोट्याला विक्री मंजुरी दिली होती. तर दुसरीकडे ऑक्टोबर २०२०च्या तुलनेत आता जादा साखर कोटा देण्यात आला आहे. सरकारने गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात २३ लाख टन साखर कोटा कारखान्यांना दिला होता.
बाजारातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हिंदू धर्मियांचा सण असलेला नवरात्रोत्सव आणि दिवाळी येत आहे. त्यामुळे अधिक कोटा देण्यात आला आहे. मात्र, सप्टेंबर २०२१च्या शिल्लक साखरेचा साठा आणि ऑक्टोबर महिन्यासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक साखर विक्रीस मंजुरी देण्यात आल्याने बाजारावर दबाव राहणार आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
केंद्र सरकारने साखरेचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी आणि दरामध्ये स्थिरता आणण्यासाठी मासिक कोटा जाहीर करण्याची पद्धती लागू केली होती.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link