केंद्र सरकार इथेनॉल उत्पादन वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. सरकारने इथेनॉल उत्पादन योजनांना तत्वतः मंजुरीही दिली आहे.
अलिकडेच सरकारने सांगितले होते की, त्यांनी ६१ इथेनॉल उत्पादन योजनांना तत्त्वतः मंजुरी दिली आहे. आणि आता आणखी १८ इथेनॉल उत्पादन योजनांना मंजुरी देण्यात आली आहे.
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने (DFPD) केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, DFPD च्या व्याज सवलत योजनेअंतर्गत आणखी १८ इथेनॉल योजनांना तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे.
यापूर्वी जेव्हा ६१ इथेनॉल उत्पादन योजनांना तत्त्वतः मंजुरी देण्यात आली होती, तेव्हा DFPD ने सांगितले होते की, या योजनांमुळे देशातील इथेनॉल उत्पादन क्षमतेत २५७ कोटी लिटरची वाढ होईल. या योजनांसाठी जवळपास ७,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची अपेक्षा आहे.