केंद्र सरकारच्या अन्न मंत्रालयाने ३० जून २०२२ रोजी राजी केलेल्या अधिसूचनेनुसार सरकारने जुलै महिन्यासाठी देशातील ४९९ कारखान्यांना २१ लाख टन साखर विक्री कोटा मंजूर केला आहे.
यावेळी गेल्या महिन्याच्या तुलनेत समान साखर कोटा मंजूर करण्यात आला आहे. अन्न मंत्रालयाने जून २०२२ मध्ये २१ लाख टन साखर विक्री कोटा वाटप केला. तर दुसरीकडे जुलै २०२१ च्या तुलनेतही आता कमी साखर कोटा देण्यात आला आहे. सरकारने जुलै२०२१ साठी २२ लाख टन साखर विक्रीस मंजुरी दिली होती.
बाजारातील रिपोर्टनुसार साखरेचा सरासरी मासिक खप २२-२३ लाख टन आहे. मान्सून सुरू झाल्यानंतरही जुलै अखेरीस सुरू होणाऱ्या हिंदूंच्या पवित्र श्रावण महिन्यामुळे साखरेच्या नियमित मागणीसोबत अतिरिक्त मागणीही असेल. एकूणच बाजारात स्थिरता राहील असे दिसून येत आहे.
केंद्र सरकारने साखरेचा पुरवठा नियंत्रित करणे आणि दर स्थिर ठेवण्यासाठी मासिक कोटा पद्धती स्वीकारली आहे.