केंद्र सरकारच्या अन्न मंत्रालयाने ३१ मे २०२२ रोजी राजी केलेल्या अधिसूचनेनुसार सरकारने जून महिन्यासाठी देशातील ५२७ कारखान्यांना २१ लाख टन साखर विक्री कोटा मंजूर केला आहे.
यावेळी गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी साखर कोटा मंजूर करण्यात आला आहे. अन्न मंत्रालयाने मे २०२२ मध्ये २२.५० लाख टन साखर विक्री कोटी वाटप केले होते. तर दुसरीकडे जून २०२१ च्या तुलनेतही आता कमी साखर कोटा देण्यात आला आहे. सरकारने जून २०२१ साठी २२ लाख टन साखर विक्रीस मंजुरी दिली होती.
बाजारातील रिपोर्टनुसार साखरेचा सरासरी मासिक खप २२-२३ लाख टन आहे. त्यामुळे जूनमध्ये मान्सूनच्या सुरुवातीला साखरेच्या खपात थोडी घसरण शक्य आहे. परिणामी नियमीत मागणी कायम राहून दर स्थिर राहतील.
केंद्र सरकारने साखरेचा पुरवठा नियंत्रित करणे आणि दर स्थिर ठेवण्यासाठी मासिक कोटा पद्धती स्वीकारली आहे.