नवी दिल्ली : भारत सरकार मक्का निर्यातीवर निर्बंध लागू करण्याचा विचार करीत आहे. सध्या मक्क्याचा दर २,१५० रुपये प्रती क्विंटलपेक्षाही जादा आहे आणि पोल्ट्री तसेच स्टार्च निर्मिती क्षेत्राकडून मागणी वाढत आहे. प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, स्टार्च उत्पादकांकडून हा मुद्दा उपस्थित केला गेल्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने वाणिज्य मंत्रालयाला पत्र पाठवून यावर निर्बंध लागू करण्याची मागणी केली आहे. कृषी मंत्रालयाची एक शाखा एगमार्कनेटकडील आकडेवारीनुसार १ ते ८ डिसेंबर यादरम्यान मक्क्याचा सरासरी दर २,१७३.६६ रुपये प्रती क्विंटल आहे. हा दर १,९६२ रुपये एमएसपीच्या दरापेक्षा अधिक आहे.
प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, स्टार्च उत्पादकांकडून उच्च किंमती आणि अनुपलब्धतेचा मुद्दा उपस्थित केला गेल्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने वाणिज्य मंत्रालयाला पत्र लिहून यावर निर्बंध लागू करण्याची मागणी केली आहे. आकडेवारीनुसार असे दिसून येते की, ऑक्टोबरच्या अखेरच्या सप्ताहात, २,१९९.२८ रुपये प्रती क्विंटलवरून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात २,०५७ रुपये प्रती क्विंटलपर्यंत घसरणीनंतर दर पुन्हा वाढू लागले आहेत. तामिळनाडू एग्ग पोल्ट्री फार्मर्स मार्केटिंग सोसायटीचे (TNEPFMS) अध्यक्ष वांगिली सुब्रमण्यम यांनी सांगितले की, आम्हाला सद्यस्थितीत नमक्कलमध्ये २,४०० रुपये दराने मक्का मिळत आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या कृषी बाजार सुचना प्रणालीने (एएमआयएस) गुरुवारी आपल्या मार्केट मॉनिटरमध्ये सांगितले की, २०२२ साठी मक्क्याचे उत्पादन गेल्या वर्षीच्या १,२१२.३ मिलियन टनापासून घटून १,१६३.६ मिलियन टन झाले आहे. TNEPFMS चे सुब्रमण्यम यांनी सांगितले की, आम्ही कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये आमची मक्क्याची गरज पूर्ण करीत आहोत. मात्र, पावसामुळे पिकामध्ये ओलसरपणाची समस्या आहे.
शेतांमधून लवकर पिक कापणी होईल अशी आमची अपेक्षा आहे. मात्र, आम्ही उपलब्धतेबाबतच्या समस्येने चिंतेत आहोत.
मक्क्याची मागणी वाढल्यानंतरही, शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडमध्ये मक्क्याच्या किमती सद्यस्थितीत मार्चच्या डिलिव्हरीसाठी तीन महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर, ६.४१ डॉलर प्रती बुशल ($ २५२.१३ प्रती टन) वर ट्रेड करीत आहेत. किमती गेल्या सप्ताहामध्ये ३ टक्के तर गेल्या महिन्यात ५ टक्के खालावल्या आहेत.