केंद्र सरकारचा इथेनॉल निर्मितीसाठी मक्का उत्पादन वाढीवर भर, खास योजना सुरू

नवी दिल्ली : देशात इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध उपायोजना करताना दिसत आहे. इथेनॉलमुळे शेतकरी आता केवळ अन्नदाताच नव्हे तर ऊर्जा प्रदाता म्हणूनही ओळखले जाऊ लागला आहेत. यासाठी सरकार मक्यापासून इथेनॉल बनवण्यावर भर देत आहे. म्हणूनच इथेनॉल उद्योगांच्या पाणलोट क्षेत्रात मका उत्पादन वाढवणे हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. याची जबाबदारी आयसीएआरअंतर्गत भारतीय मका संशोधन संस्थेला (आयआयएमआर) देण्यात आली आहे. त्याअंतर्गत मक्याचे उत्पादन वाढविण्यात येत आहे.

एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार, आयआयएमआरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. एल. जाट यांनी सांगितले की, इथेनॉलसाठी मक्याचे उत्पादन वाढविण्याच्या मोहिमेत एफपीओ, शेतकरी, डिस्टिलरी आणि बियाणे उद्योग एकत्र काम करीत आहे. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांचे बियाणे वाटप करण्यात येत आहे. प्रकल्पांतर्गत खरीप आणि रब्बी हंगामात १५०८ एकरांवर मका पेरणी करून शेतकऱ्यांना त्याची लागवड वाढवण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत पेट्रोलमध्ये १२ टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट गाठले आहे. २०२५ पर्यंत ते प्रमाण २० टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे केवळ उसापासूनच नव्हे तर तांदूळ आणि मक्यापासून इथेनॉल बनविण्यावर सरकार भर देत आहे. खरीप हंगामात ७८८ एकर क्षेत्रात मक्याची लागवड करण्यात आली. आता ६७२ एकरांवर मका पिक लागवड केली आहे. इथेनॉल बनवण्यात मक्याचे योगदान वाढत असल्याचे जाट यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here