केंद्र सरकार अतिरिक्त गव्हाची विक्री करण्याची शक्यता

नवी दिल्ली : गव्हाची उपलब्धता वाढवणे आणि आट्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकार लवकरच आपल्याकडील अतिरिक्त गहू वेगवेगळ्या राज्यांमध्ये छोट्या प्रमाणात विक्री करू शकते. टाइम्स ऑफ इंडिया (टीओआय) मधील एका वृत्तानुसार, आटा कारखानदारांनी सरकारला सांगितले आहे की, त्यांच्याकडे गव्हाचा एक ते दोन महिन्याचाच साठा शिल्लक आहे. गव्हाचे व्यापारी कथितरित्या आगामी महिन्यांत गहू जादा दराने विक्री करण्याची तयारी करीत आहेत. टीओआयच्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, २०.५ मिलियन टनाच्या बफर साठ्याच्या तुलनेत भारतीय खाद्य निगमकडे (FCI) २२.५ मिलियन टन अतिरिक्त गव्हाचा साठा आहे.

रोलर फ्लोअर मिलर्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रमोद कुमार एस. यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, आम्ही सरकारकडे खुल्या बाजारातील आपल्या साठ्यापैकी ४० लाख टन गहू उपलब्ध करण्याची विनंती केली आहे. त्यांच्याकडे आवश्यक बफर स्टॉकिंग निकषांपेक्षा अधिक गहू आहे. आणि बाजारातील गव्हाच्या उपलब्धतेमुळे वाढत्या किमती कमी होतील. एक एप्रिल २०२३साठी अनुमानीत साठा ११.३ मिलियन आहे. तर बफर स्टॉकची गरज ७.५ मिलियन टनाची आहे. सरकारकडून अतिरिक्त गव्हाच्या विक्रीच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे. मात्र, अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here