केंद्र सरकार ने साखरेची एमएसपी वाढविण्याची गरज : वैभव नायकवडी

सांगली : ज्या प्रमाणात एफआरपी वाढते, त्या प्रमाणात एमएसपी (साखरेची किंमत) वाढत नाही. त्यासाठी सरकारने आगामी पाच वर्षांचे साखर उद्योगाचे नियोजन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी केले. पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याच्या ४१ गळीत हंगामाच्या सांगता सभेत ते बोलत होते. टनाला ४०० रुपये वाढले पाहिजेत, असा आमचा प्रयत्न आहे असे त्यांनी सांगितले.

कार्यकारी संचालक समीर सलगर यांनी प्रास्ताविक केले. संचालक गौरव नायकवडी म्हणाले, येत्या हंगामात ७ लाख टन गाळप झाले पाहिजे. तसे नियोजन करावे. यावेळी जास्त ऊसतोड करणारे ट्रॅक्टर मालक दिलीप शेवाळे, पोपट शेवाळे, अनिकेत खोत, आंगद गाडी मालक विजय पाटील, युनूस शेख, दत्तात्रय पाटील, बैलगाडी वाहतूकदार नीलेश आरडे, तिलाजी पारडे, बाबासाहेब आरडे, तसेच तोडणी मशीन मालक विक्रम पाटील, जालिंदर कदम आदींचा सत्कार करण्यात आला. हुतात्मा बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, वीरधवल नायकवडी, बझारचे अध्यक्ष दिनकर बाबर, डॉ. सुषमा नायकवडी, केदारज्योती नायकवडी, डॉ. अशोक माने, उमेश घोरपडे, संचालक विशाखा कदम, जयश्री अहिर, माजी अध्यक्ष महादेव कांबळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here