केंद्र सरकारकडून एप्रिल २०२३ साठी २२ लाख टन साखर विक्री कोटा जाहीर

केंद्र सरकारने २९ मार्च २०२३ रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, सरकारच्या अन्न मंत्रालयाने एप्रिल २०२३ साठी देशातील ५२५ कारखान्यांना साखर विक्रीसाठी २२ लाख टनाचा कोटा मंजूर केला आहे. एप्रिल २०२२ आणि २०२१ मध्येही समान साखर कोटा मंजूर करण्यात आला होता.

बाजारातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या उन्हाळ्यामुळे मागणीत आणखी तेजी येवू शकते. आणि यासोबतच कमी पुरवठ्यामुळे साखरेच्या किमती प्रती क्विंटल ६० ते ८० रुपये प्रती क्विंटल वाढण्याची शक्यता आहे.
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

केंद्र सरकारने साखर पुरवठा नियंत्रित ठेवणे आणि दर निश्चितीमध्ये स्थिरतेसाठी मासिक कोटा वितरण प्रणाली लागू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here