केंद्र सरकारकडून जानेवारी २०२३ साठी २२ लाख टन साखर विक्रीचा कोटा जारी

केंद्र सरकारच्या अन्न मंत्रालयाने ३० डिसेंबर २०२२ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जानेवारी २०२३ साठी देशातील ५५३ साखर कारखान्यांसाठी साखर विक्रीचा २२ लाख टनाचा कोटा मंजूर केला आहे.

या वेळी गेल्या महिन्याच्या तुलनेत समान साखर कोटा देण्यात आला आहे. अन्न मंत्रालयाकडून डिसेंबर २०२२ साठी २२ लाख टन साखर विक्रीच्या कोट्यास मंजुरी दिली होती. तर दुसरीकडे जानेवारी २०२२ च्या तुलेत या महिन्यात कमी साखर कोटा देण्यात आला आहे. सरकारने डिसेंबर २०२२ मध्ये २१.५० लाख टन साखर कोटा मंजूर केला होता.

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने एक ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here