केंद्र सरकारच्या अन्न मंत्रालयाने २८ फेब्रुवारी २०२३ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुार मार्च २०२३ साठी देशातील ५१९ साखर कारखान्यांना साखर विक्रीसाठी २२ लाख टनाचा कोटा मंजूर केला आहे.
या वर्षी गेल्या महिन्याच्या तुलनेत जादा साखर मंजूर करण्यात आली आहे. अन्न मंत्रालयाद्वारे फेब्रुवारी २०२३ साठी २१ लाख टन साखर विक्रीचा कोटा मंजूर करण्यात आला होता. तर दुसरीकडे मार्च २०२२ च्या तुलनेत यंदा जादा साखर कोटा देण्यात आला आहे. सरकारने मार्च महिन्यासाठी २१.५० लाख टन साखर कोटा देण्यात आला होता.
बाजारातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी मंजूर केलेल्या कोट्याच्या तुलनेत फक्त ०.५ लाख टन जादा साखर विक्रीस मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, उन्हाळ्याच्या सुरुवातीचा काळ पाहता मागणीत गतीने वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये गळीत हंगाम लवकरच समाप्त होण्याच्या अपेक्षेने बाजारविषयक तज्ज्ञांना साखरेच्या किमतीमध्ये तेजीची आशा आहे.
नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा.