नवी दिल्ली : अन्न मंत्रालयाने २७ फेब्रुवारी रोजी मार्च २०२४ साठी २३.५ लाख टन (LMT) मासिक साखर विक्री कोटा जाहीर केला आहे. हा कोटा मार्च २०२३ मध्ये वाटप केलेल्या २२ लाख टनपेक्षा १.५ लाख टन जास्त आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी २०२४ मध्ये देशांतर्गत विक्रीसाठी साखरेचा कोटा २२ लाख टन होता.
अन्न मंत्रालयाने फेब्रुवारी २०२४ च्या साखर कोट्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असेही जाहीर केले आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, यामुळे बाजार स्थिर राहील. साखरेचा दर २० ते ३० रुपये प्रती क्विंटल (अधिक किंवा उणे) या श्रेणीत राहण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी, मार्च २०२३ मध्ये हंगामपूर्ण जोमात होता. तर चालू हंगामात गाळप पूर्ण क्षमतेने सुरू नाही. त्यामुळे किमती स्थिर राहण्याची अपेक्षा आहे.