केंद्र सरकारने २८ जुलै २०२३ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ऑगस्ट २०२३ साठी सरकारच्या अन्न मंत्रालयाने देशातील साखर कारखान्यांना साखर विक्रीचा २३.५० लाख टनाचा कोटा मंजूर केला आहे. ऑगस्ट २०२२ च्या तुलनेत १.५० लाख टन कोटा जादा मंजूर करण्यात आला आहे. तर गेल्या महिन्याच्या तुलनेत ०.५० लाख टन कमी कोटा मंजूर केला आहे. याशिवाय, सरकारने जुलै २०२३ मधील विक्री न झालेल्या साठ्यासाठी १५ दिवसांची मुदत वाढविण्याची घोषणाही केली आहे.
बाजारातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, आगामी कालावधीत बाजार स्थिर राहील अशी शक्यता आहे. आणि जुलै २०२३ मधील कोट्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आल्याने साखर विक्रीवर दबाव राहाणार नाही.
केंद्र सरकारने साखर पुरवठा नियंत्रित ठेवणे आणि दर निश्चितीमध्ये स्थिरतेसाठी मासिक कोटा वितरण प्रणाली लागू केली आहे.