कोल्हापूर, ता. 22 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभर लॉकडाऊनची स्थिती आहे. भारतात घरगुती विक्रीसाठी साखर लागते आणि साखर मिठाई, औषध निर्मिती, शितपेयासाठी वापरली जाते. सध्या हे उद्योगही बंद आहेत. त्यामुळे, औद्योगिक कारणासाठी विक्री होणारी साखर ही विक्री होत नाही, त्यामुळे, 2020-21 सालच्या गळीत हंगामात साखरेला आणि ऊसाला चांगला दर मिळण्यासाठी साखर निर्यातीशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी बोलताना व्यक्त केले.
राजू शेट्टी म्हणाले, उन्हाळा सुरु झाल्यनंतर शीतपेय, मिठाई, औषण निर्मितीसह इतर कारणासाठी लागणाऱ्या साखरेला चांगली मागणी असते. आता जगभर लॉकडाऊन आहे. त्यामुळे साखरेचा उठाव होत नाही. त्यामुळे साखर गोडावूनमध्ये पडून आहे. सध्या असणारी साखरेचा उठाव झाला पाहिजे. पण कोरोनाची परिस्थिती आणखी किती दिवस चालेले हे सांगता येत नाही. याचा साखर उद्योगाला फटका बसत आहे. यावर्षीची साखर विक्री करण्याचे आव्हान आणि पुढील हंगामात म्हणजेच 2020-21 मध्ये तयार होणारी साखर पाहता, केंद्र सरकारने भारतातील साखर निर्यात करण्यावर भर दिला पाहिजे. तरच साखर कारखान्यांसह शेतकऱ्यांनाही ऊसाचे चांगले पैसे मिळू शकतील.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.