नवी दिल्ली : केंद्र सरकार हंगाम २०२२-२३ साठी लवकरच साखर निर्यात धोरणाची घोषणा करू शकते.
प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आम्ही एका आठवड्यात २०२२-२३ साठी साखर निर्यात धोरणाची घोषणा करू शकतो.
देशातील अनेक राज्यांमध्ये साखर कारखान्यांनी उसाचे गाळप सुरू केले आहे. उसाचा रस, सिरप, मोलॅसीसला इथेनॉलमध्ये रुपांतरीत करण्यासाठी साखर उत्पादनात ४५ लाख टनाची घट लक्षात घेऊन ISMA ने २०२२-२३ या हंगामात जवळपास ३६५ लाख टन साखर उत्पादन होईल असे अनुमान वर्तवले आहे.
ISMAच्या म्हणण्यानुसार, १ ऑक्टोबर २०२२ रोजी जवळपास ५५ लाख टन शिल्लक साठ्यासह हंगाम २०२२-२३ साठी जवळपास ३६५ लाख टन साखर उत्पादन आणि २७५ लाख टन अनुमानीत देशांतर्गत विक्रीसह ९० लाख टन अतिरिक्त साखर शिल्लक राहील. ही साखर निर्यात करण्याची गरज आहे. तरच समान क्लोजिंग स्टॉक शिल्लक राहील.