सेलम : सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉलचा टक्का वाढविण्यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांचे माजी मुख्यमंत्री इडप्पादी के. पलानीस्वामी यांनी स्वागत केले आहे. सेलममध्ये शेतकरी संमेलनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. फेडरेशन ऑफ तामीळनाडू अॅग्रीकल्चरिस्ट असोसिएशनकडून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
संमेलनात बोलताना पलानीस्वामी म्हणाले की, केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन दिले आहे. त्यातून ऊस शेतीला आणखी पाठबळ मिळाले आहे. इथेनॉल उत्पादनासाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाते. बँका ३.५ % व्याजावर ९५.५ % कर्ज देत आहेत. पलानीस्वामी यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपल्या सरकारने केलेल्या कामांची उजळणी केली. पलानीस्वामी म्हणाले की, आमच्या सरकारने पाणी व्यवस्थापनाला महत्त्व दिले. कुडीमारमथू योजनेची सुरुवात केली आणि सेलमसाठी १०० नव्या योजना आणल्या. त्याच्या माध्यमातून मेट्टूर धरणातील अतिरिक्त पाणी वळविणे शक्य आहे, असे पलानीस्वामी यांनी यावेळी सांगितले.