नवी दिल्ली : जून महिन्यात समाप्त पिकाच्या हंगामात २०२१-२२ साठी ३० कोटी ७३.३ लाख टन खाद्यान्न उत्पादनाचे उद्दिष्ट सरकारने निश्चित केले आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०२०-२१ या वर्षातील उच्चांकी ३० कोटी ८६.५ लाख टनाच्या तुलनेत हे उद्दिष्ट थोडे कमी आहे. गेल्या वर्षीचे उत्पादन ३.७४ टक्क्यांनी अधिक आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून आयोजित रब्बी अभियानावेळी २०२१-२२ साठीच्या कृषी क्षेत्रावरील राष्ट्रीय परिषदेच्या दरम्यान पिक उत्पादनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, केंद्र सरकार उत्पादन आणि उत्पादकता वाढीसाठी राज्यांना प्राधान्य देईल. सर्व ती मदत केली जाईल. ते म्हणाले, सरकार हवामान बदल आणि पावसामुळे शेतीच्या उत्पादनात होणाऱ्या घटीबाबत आणि येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी राज्यांना मदत करण्यास कटिबद्ध आहे.
तोमर यांनी राज्यांना पाणी, वीज, खते यांचा वापर मर्यादीत स्वरुपात आणि नेमका करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नॅनो युरियाचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यातून खतांसाठीचा खर्च कमी होणार आहे असे त्यांनी सांगितले. कृषी विज्ञान केंद्रांनी छोट्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून सरकारच्या योजनांचा लाभ दिला पाहिजे असेही मंत्री तोमर यांनी स्पष्ट केले. राज्यांनी किसान क्रेडिट कार्डचा वापर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link