दिल्लीत पेट्रोल दराचे शतक, मुंबईत ११५ रुपये दर

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दराचा भडका अद्याप थांबलेला नाही. तेल वितरण कंपन्यांनी आज, मंगळवारी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली. पेट्रोलच्या दरात ८० पैसे तर डिझेल ७० पैशांनी महागले आहे. गेल्या आठ दिवसांत सातव्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. यासोबतच दिल्लीत पेट्रोल १००.२१ रुपये आणि डिझेल ९१.४७ रुपये प्रती लिटर झाले आहे.

गेल्या वर्षी चार नोव्हेंबरपासून या वर्षी २१ मार्चपर्यंत पेट्रोलचे दर स्थिर होते. यादरम्यान उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या. या राज्यांच्या निवडणूका संपल्यानंतर २२ मार्च पासून इंधन दरवाढ सुरू झाली आहे. तेव्हापासून एक दिवस वगळता सात दिवस दर वाढले आहेत. पेट्रोल पाच वेळा ८० पैसे, एकदा ५० पैसे आणि एकदा ३० पैशांनी वाढले. गेल्या वर्षी सप्टेंबरनंत डिझेलची दरवाढ गतीने झाली होती. यावर्षई २२ मार्चपासू डिझेलची दरवाढ जास्त झाली आहे. सात दिवसांत ४.८० रुपये डिझेल महागले आहे. मुडीजच्या एका अहवालानुसार, पाच राज्यांतील निवडणुकांमुळे आयओसी, एचपीसीएल, बीपीसीएलने पेट्रोल, डिझेलची दरवाढ केली नव्हती. त्यामुळे त्यांना १९००० कोटी रुपयांचे नुकसान झाले. आयओसीला १ ते १.१ अब्ज डॉलर, बीपीसीएल आणि एचपीसीएलला प्रत्येकी ५५ ते ६५ कोटी डॉलरचे नुकसान झाले. क्रिसीलच्या रिपोर्टनुसार, नुकसान भरपाईसाठी पेट्रोल – डिझेलची किंमत १५ ते २० रुपयांनी वाढवावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here