जिल्हा ऊस अधिकाऱ्यांकडून रोपवाटिकेतील बियाण्याचे प्रमाणीकरण

पिलिभित : जिल्हाभरातील रोपवाटिकांमध्ये लावणीसाठी उसाचे बियाणे उपलब्ध आहे. जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी आधार नर्सरीतील ऊस बियाणे प्रमाणित केले. अधिकाऱ्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी दर तीन वर्षांनी बियाणे बदलावे. एकाच जातीची सतत पेरणी केल्यास किडीचा धोका वाढतो. शेतकऱ्यांना त्यांनी जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी सुधारित बियाणे वापरण्याचे आवाहन करण्यात आले.

‘लाईव्ह हिंदूस्थान’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, उसाच्या शरद ऋतूतील लावणीसाठी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मुख्यालयातून २,९९२ क्विंटल ऊस बियाण्याचे वाटप करण्यात आले आहे. हे बियाणे शाहजहांपूर येथील उत्तर प्रदेश ऊस संशोधन परिषद, सिरसा – बरेली ऊस संशोधन केंद्र, साखर कारखाना क्षेत्र पिलीभीत आणि साखर मिल क्षेत्र पुवाया येथे हे बियाणे उपलब्ध होईल. वाटप केलेल्या बियाण्यांसह जिल्ह्यातील प्रगतीशील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात शरद ऋतूतील रोपवाटिकांची स्थापना करण्यात येणार आहे.

जिल्हा ऊस अधिकारी खुशी राम म्हणाले की, शरद ऋतूतील रोपवाटिका स्थापन करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्या मंडळातील ऊस पर्यवेक्षक किंवा एससीडीआयकडे संपर्क साधावा. या आधारभूत रोपवाटिकांमधून पुढील वर्षी बियाणे वाटपावर प्रति क्विंटल ५० रुपये अनुदानही दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना कोशा-०१३२३५, कोएल- १४२०१, को- ०११८, कोशा- १३३३२ या ऊसाच्या सुरुवातीच्या जाती आणि कोशा- ०९२३२, कोशा- ०१४२३३, कोशे- १३४५२ या उशिरा पिकणाऱ्या वाणांचे बियाणे मिळतील.

शेतकऱ्यांनी लागणीपूर्वी कलमांवर बुरशीनाशक (बाविस्टिन ०.२टक्के) प्रक्रिया करावी. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उत्तर प्रदेश ऊस संशोधन परिषद/शुगर मिल फार्मकडून नवीन विकसित ऊस जातींचे बियाणे ६०० रुपये प्रती क्विंटल दराने आणि नोंदणीकृत बियाणे उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले प्रमाणित बियाणे रुपये ५०० प्रती क्विंटल दराने मिळेल. इतर लवकर आणि मध्य-उशीरा पक्व होणाऱ्या वाणांचे बियाणे ४२५ रुपये प्रती क्विंटल दराने उपलब्ध असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here