पालघर आयुक्तालय, मुंबई विभागाच्या तपास शाखेच्या अधिकाऱ्यांनी, बनावट पावत्या तयार करणाऱ्या एका टोळीचा छडा लावला आहे , ज्यामध्ये 11.61 कोटी रुपये इतक्या अपात्र आयटीसीचा लाभ मिळवून दुसऱ्याकडे देण्यात आला. याप्रकरणी हॅकनप ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक नीलेश बी. शहा याला 8.02.2024 रोजी अटक करण्यात आली आहे.
गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हॅकनअप ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीविरोधात तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान ही कंपनी अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. नीलेश बी. शहा यांचा जबाब नोंदवण्यात आला आणि त्यांच्या जबानीत त्यांनी कबूल केले की हॅकनअप ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर अनेक बनावट कंपन्यांच्या निर्मितीमध्ये त्याचा सहभाग होता , ज्या किरण कंथारिया याच्या सूचनांनुसार अपात्र आयटीसी मिळवणे आणि दुसऱ्याला देण्याचे काम करत होत्या.
हॅकनअप ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेडने कुठल्याही वस्तू आणि/किंवा सेवांचा पुरवठा न करता बनावट बिलांच्या आधारे 3.90 कोटी रुपये अपात्र आयटीसी दुसऱ्याला देत 7.71 कोटी रुपये आयटीसी मिळवला . तपासादरम्यान गोळा केलेल्या भौतिक पुराव्यांच्या आधारे, नीलेश बी. शहा याला सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 69 च्या तरतुदींअंतर्गत 8.02.2024 रोजी अटक करण्यात आली.
(Source: PIB)