छ. राजाराम कारखान्यातर्फे हंगामातील १०० टक्के ऊस बिले अदा : माजी आमदार महादेवराव महाडिक

कोल्हापूर : कसबा बावडा येथील छ. राजाराम सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगाम २०२३-२४ मधील १२५.२९ कोटी रुपयांची ऊस बिले ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहेत. कारखान्याचे संचालक, माजी आ. महादेवराव महाडिक यांनी ही माहिती दिली. कारखान्याने चालू हंगामात ४ लाख ४ हजार १६२.५१९ मे. टन ऊस गाळप करून ११.६० टक्के साखर उताऱ्यासह ४ लाख ६७ हजार २०० क्विंटल साखर उत्पादन केले आहे.

कारखान्याचा सन २०२३ २४ चा गळीत हंगाम १६ नोव्हेंबर २०२३ रोजी सुरू झाला व २१ मार्च रोजी संपला. हंगामात २१ मार्चअखेर गाळप झालेल्या उसाची निव्वळ देय एफआरपी ३१०० रुपये प्रती टनानुसार १२५.२९ कोटी रुपयांची ऊस बिले ऊस पुरवठादार शेतकरी, सभासदांच्या बँक खात्यावर जमा केली आहे. तोडणी, वाहतूकीची बिले अदा केली आहेत असे महाडिक म्हणाले. यावेळी कारखान्याचे चेअरमन, माजी आ. अमल महाडिक, व्हा. चेअरमन नारायण चव्हाण व सर्व संचालक, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here