चामराजनगर : कोतनूर जिल्ह्यातील एकमेव बण्णारी अम्मन साखर कारखाना सुरु झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी खुश आहेत. लॉकडाउनमुळे साखर कारखाना सुरु होईल की नाही याबाबत शाशंकता होती. साखर कारखाना व्यवस्थापनाने जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने ऊस गाळप सुरु करण्याची घोषणा केली. यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
यावेळी साखर कारखाना उशिरा सुरु झाल्यामुळे ऊसाचे पीक वाळून चालले होते. जर हा कारखाना सुरु झाला नसता तर जिल्ह्यातील ऊस शेतकर्यांना तामिळनाडू च्या साखर कारखान्यांना ऊस द्यावा लागला असता. कारखाना व्यवस्थापनाने सांगितल्यानुसार, कारखान्यामध्ये प्रति दिन 3600 टन ऊसाचे गाळप केले जाईल. प्रति दिन इथे 20 मेगावॅट विजेचे उत्पादनही केले जाईल. यामध्ये साखर कारखान्यासाठी 7 मेगावॅट विजेचा वापर करुन, उर्वरीत विज केपीटीसीएल ला विकली जाईल. यामुळे कारखान्याला अधिक पैसा मिळाल्यावर शेतकर्यांची देणीही भागवली जातील.
मैसूर तथा चामराजनगर जिल्ह्यतील 11 हजार शेतकर्यांकडून 2 हजार 874 रुपये प्रति टन प्रमाणे ऊस खरेदी केला जाईल. या साखर कारखान्यामध्ये 3200 पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. चामराजनगर जिल्हा ग्रीन झोनमध्ये असूनही जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या आदेशाचे पालन केले जात आहे.
जिल्हा उपायुक्त एमआय रवि यांच्या अनुसार, या कारखान्यामध्ये प्रति वर्षी सरासरी 68 हजार मेट्रीक टन ऊस गाळप केले जाते. कारखाना व्यवस्थापनाला 50 टक्के कर्मचार्यांचा वापर करुन सामाजिक अंतर राखण्याचा नियमाचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कर्मचार्यांना व्यक्तीगत सुरक्षा साहित्य उपलब्ध करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.