नवी दिल्ली: तामिळनाडू मध्ये आता चक्रीवादळ ‘निवार‘ ची जखम भरलेली नाही की आणखी एक वादळ तामिळनाडूच्या उंबरठ्यावर येवून ठेपले आहे. खरतर बंगालच्या खाडीच्या दक्षिणपूर्व आणि दक्षिण पश्चिम मध्ये असणारा हवेचा दबाव 13 किमी तासाच्या वेगाने पश्चिमेकडे येत आहे. हवामानानुसार, सध्या श्रीलंकेमध्ये त्रिंकोमाली च्या दक्षिण पूर्व मध्ये 460 किमी आणि कन्याकुमारी पासून 860 किमी मध्ये आहे.
यापुढील 12 तासांमध्ये चक्रीवादळ तेज होवून पश्चिम उत्तर पश्चिम च्या जवळ येण्याची शक्यता आहे. हे दोन डिसेंबरला संध्याकाळी किंवा रात्रीपर्यंत त्रिकोमाली जवळ श्रीलंकेच्या सीमेला पार करुन मगरिब कडे सरकू शकते.
तीन डिसेंबर ला सकाळी मन्नारच्या खाडी आणि आसपासच्या कोमेरिन परिसरामध्ये पोचण्याची शक्यता आहे. चार डिसेंबरला हे वादळ सकाळी पमबन आणि कन्याकुमारी दरम्यान सीमा पार करु शकते. दोन ते तीस डिसेंबर पर्यंत कन्याकुमारी, तिरुनालवेेली, थुथुकुडी, तेनकासी, रामनाथपुरम आणि शिवगंगाई जिल्ह्यामध्ये मोठा पाउस पडण्याची शक्यता आहे. हे पाहता मच्छीमारांना या दरम्यान समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.