चांद्रयान-३ मोहीम: भारताची चंद्रावर स्वारी…

श्रीहरिकोटा : GSLV मार्क 3 (LVM 3) हेवी-लिफ्ट लॉन्च व्हेइकल आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून नियोजित प्रक्षेपणानुसार यशस्वीरित्या प्रक्षेपित झाले. सर्व जगाचे भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेकडे लक्ष लागले आहे. पृथ्वीपासून चंद्रापर्यंत जाण्यासाठी यानाला सुमारे एक महिना लागणार असून 23 ऑगस्ट रोजी लँडिंग अपेक्षित आहे. चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर आपले अंतराळ यान उतरवणारा आणि चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंगसाठी देशाची क्षमता प्रदर्शित करणारा अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारत हा चौथा देश बनवेल.

चांद्रयान-३ लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूलने सुसज्ज आहे. त्याचे वजन सुमारे 3,900 किलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 14 जुलै 2023 हा दिवस भारताच्या अवकाश क्षेत्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. त्यांनी ट्विट केले होते की, चांद्रयान-३ मिशन आपल्या देशाच्या आशा आणि स्वप्नांना पुढे नेईल. आमच्या शास्त्रज्ञांचे आभार. भारताचा अवकाश क्षेत्रातील खूप समृद्ध इतिहास आहे. चांद्रयान-3 मोहिमेसाठी शुभेच्छा देताना, पंतप्रधान मोदींनी लोकांना या चंद्र मोहिमेबद्दल आणि भारताने अंतराळ, विज्ञान आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रात केलेल्या प्रगतीबद्दल अधिक जाणून घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, यामुळे तुम्हा सर्वांना अभिमान वाटेल.चंद्रयान- 3 मोहीम यशस्वी होणार आहे आणि ही भारतासाठी एक गेम चेंजर घटना आहे, असे इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here