चव्हाण कारखान्याचे तीन टप्प्यांत ‘एफआरपी’संदर्भात शेतकऱ्यांशी करारपत्र : स्वाभिमानी शेतकरी संघटना

नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादकांकडून तीन टप्प्यांत एफआरपी (रास्त व किफायतशीर किंमत) देण्यासंदर्भात लिहून घेत आहे. शेतकऱ्यांनी यंदा उसाची टंचाई असल्यामुळे कोणतेही करारपत्र लिहून देऊ नये, गूळ उत्पादक किंवा अधीकचा भाव देणाऱ्या‍ कारखान्यांना ऊस द्यावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगारे यांनी केले आहे.

‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील देगाव-येळेगाव येथील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने त्यांच्या कार्यक्षेत्रातील नवीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे करारपत्र लिहून घेणे सुरू केल्याचे राजेगोरे यांनी सांगितले. यात ऊसतोडीसाठी सहमती असून, विनातक्रार ऊस देऊ, पहिला हप्ता एफआरपीच्या ७५ टक्के राहील, त्यातून ऊसतोड व वाहतूक खर्च कपात करून ऊसतोड व वाहतूक करणाऱ्यांना देण्यात येईल, दुसरा हप्ता १५ टक्क्यांनुसार ३१ जुलैपर्यंत खात्यावर जमा करण्यात येईल, तिसरा हप्ता एफआरपीच्या १० टक्क्यांनुसार रक्कम ऊसपुरवठ्यानंतर ३१ ऑक्टोबरपर्यंत खात्यावर जमा करण्यात येईल अशा अटी आहेत. दरम्यान, वरील प्रमाणे तीन टप्यांत एफआरपी जमा झाली नाही तर त्यावर आकारण्यात येणाऱ्या व्याजाचा हक्कही सोडण्यास तयार असल्याचे करारपत्रकात म्हटल्याचे हनुमंत राजेगोरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here