बांगलादेशमध्ये गरिबांना मिळणार स्वस्त साखर

ढाका : लॉकडाउनच्या काळात अनेकांच्या उत्पन्नात घट झाली. त्यांना दिलासा देण्यासाठी ट्रेडिंग कॉर्पोरेशनने ऑफ बांगलादेशच्या ओपन मार्केट सेलच्या ट्रकमधून आजपासून साखरेसह सोयाबीन तेल आणि डाळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या टीसीबीने रविवारी एका अधिसूचनेतून सांगितले की साखरेचा दर प्रती किलो ५५ रुपये असेल. प्रत्येक ग्राहकाला एकावेळी २ ते ४ किलो साखर खरेदीची मुभा असेल. ही विक्री प्रत्येक शहर, जिल्हा आणि उपजिल्ह्यात ४५० ट्रक्सच्या माध्यमातून होणार आहे.

प्रत्येक ट्रकमध्ये ५०० ते ८०० किलो साखर, ३०० ते ०० किलो डाळ आणि ८०० ते १२०० लिटर सोयाबीन तेल असेल. कोविड १९ मुळे अनेक मध्यमवर्गीय तसेच कनिष्ठ गटातील लोकांच्या दैनंदिन जगण्याला फटका बसला आहे. लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीतही अडचणी येत आहेत. सध्या बाजारात साखर ७२ ते ७८ रुपये किलो दराने विकली जात आहे. त्यामुळे ईदची सुट्टी वगळता २९ जुलैपर्यंत ओएमएसच्या माध्यमातून साखर विक्री सुरू राहाणार असल्याचे टीसीबीने स्पष्ट केले आहे.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here