धाराशिवमध्ये महाराष्ट्रात सर्वात स्वस्त सीएनजी, दर ७५ रुपये किलो: नॅचरल उद्योग समुह प्रमुख बी.बी. ठोंबरे

धाराशिव : उस्मानाबाद परिसर आणि धाराशिव जिल्ह्यातील वाहनधारकांच्या सुविधेसाठी येथे शिवरत्न सीएनजी स्टेशनचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या इंधनामध्ये कपात व्हावी आणि आपल्या मातीतील इंधनाचे उत्पादन केले जावे या हेतूने नॅचरल उद्योग समुहाच्या माध्यमातून हे स्टेशन सुरू करण्यात आले आहे. याची माहिती देताना उद्योग समुहाचे प्रमुख बी.बी. ठोंबरे म्हणाले की, देशात सध्या ज्या पद्धतीने पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनाचा पुरवठा केला जातो, त्यातून देशाला दरवर्षी १६ लाख कोटी रुपये परकीय चलन खर्च करावे लागते. हा खर्च कमी व्हावा, आयात कमी व्हावी यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

ठोंबरे म्हणाले की, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रेरणा दिल्याने त्यानुसार, नॅचरल परिवाराच्या माध्यमातून उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादनाचा प्लांट सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर २०२२ पासून सांडपाणी व प्रेसमड यापासून नॅचरल उद्योग समुहाच्या माध्यमातून बायो सीएनजी म्हणजेच आपल्या मातीतलं इंधन उत्पादनाचा प्लांट सुरू केला आहे. आता आपल्या मातीतल्या माणसांसाठी धाराशिव शहराजवळ शिवरत्न बायो सीएनजीच्या माध्यमातून सीबीजी उपलब्ध करून दिला आहे. पर्यावरण संतुलनासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. शिवरत्न सीएनजी स्टेशनमध्ये सीएनजीचा दर ८० रुपये आहे. मात्र, दिवाळीनिमित्त ७५ किलोने त्याची विक्री सुरू आहे. वाहनधारकांनी सीबीजीचा म्हणजेच आपल्या मातीतील इंधनाचा वापर करावा, असे आवाहनही ठोंबरे यांनी केले.

साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here