बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे, आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यात उसाच्या खोट्या पावत्यांचा गैरव्यवहार कोट्यवधींच्या घरात पोहोचला आहे. मयत शेतकऱ्यांच्या नावावर तसेच शेतकऱ्यांची खोटी नावे देऊन बाहेरच्या राज्यांतून ऊस साखर कारखान्यांवर आणला जात असल्याचे उघड झाले आहे.
खोट्या पावत्यांच्या प्रकारातमध्ये कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर जास्त ऊस दाखण्यात आला आहे. यात अल्पभूधारक शेतकऱ्यांचाही समावेश आहे. अशा ९० पावत्या सापडल्या आहेत. मयत शेतकऱ्यांच्या नावे साडे आठ हजार खोट्या पावत्या असून, पाच हजारहून अधिक काल्पनिक नावे घुसडण्यात आली आहेत. अशा खोट्या पावत्यांच्या माध्यमातून रोज हरियाणातून २५ ते ३० हजार क्विंटल ऊस साखर कारखान्यांमध्ये येऊ लागला आहे. कोट्यवधींचे व्यवहार या माध्यमातून होऊ लागले आहेत. त्यात कारखान्यांचे विभागीय अधिकारी, ऊस निरीक्षक, कर्मचारी आणि माफिया या सगळ्यांची साखळीच काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हरियाणातून रोज रात्री उसाचे ट्रॅक्टर शामली हून मुजफ्फरनगरच्या सीमा भागातून येतात. रोज सुमारे २५ ते ३० क्विंटल ऊस अशा पद्धतीन आणला जात आहे. उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांमध्ये हा ऊस खपवला जात असून, यावरून किती मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार सुरू आहे, याची कल्पना येऊ शकते.
याबाबत लुहारी खुर्दचे शेतकरी शाहिद हुसैन यांनी साखर आयुक्तांकडे तक्रार केली असून, जिल्ह्यात १०० कोटी रुपयांहून अधिक किमतीचा ऊस दुसऱ्या मार्गाने कारखान्यांमध्ये जाऊ लागल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या साखळीमध्ये साखर कारखान्यांचे कर्मचारीही समील झाले आहेत. या तक्रारीमध्ये शेतकऱ्यांच्या नावांची यादीही समाविष्ट करण्यात आली असून, त्यात शेती क्षेत्रापेक्षा अधिक ५० टक्के ऊस नोंदवल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांची काल्पनिक नावेही जोडण्यात आली आहेत. दरम्यान, चार दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी उसाच्या पावती गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली होती. या व्यवस्थेमध्ये मोठ्याप्रमाणावर सुधारणा झाली असून, एका दिवसांत पूर्ण व्यवस्थाच बदलेल अशी स्थिती नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हा ऊस अधिकारी आर. डी. द्विवेदी यांनी दिली. हरियाणातून ऊस उत्तर प्रदेशात येत असल्याचा त्यांनी इन्कार केला.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp