नवी दिल्ली: प्रत्येक व्यक्तीचे कोणत्या ना कोणत्या प्रकारचे बँकेत काम असतेच. विविध प्रकारच्या बँकिंग सुविधांच्या डिजिटल माध्यमावर उपलब्ध असूनही चेक क्लिअरन्स, लोन शी संबंधीत सेवा आणि इतरही विविध प्रकारच्या कमासाठी आपल्याला बँकेत जावे लागू शकते. डिसेंबर मद्ये रविवारी आणि शनिवार शिवाय वेगवेगळ्या झोनमध्ये बँकाना 10 दिवसांची सुट्टी राहील. अशामध्ये जर तुम्हाला बँकेशी संबंधीत कोणतेही काम करायचे असेल तर हे योग्य राहिल की, तुम्ही बँकांच्या सुट्ट्यांची यादी पूर्ण पाहूनच घरातून बाहेर पडा, अन्यथा बँक शाखा बंद झाल्यास तुम्हाला पुन्हा घरी परतावे लागेल.
3 डिसेंबर : Kankadasa Jayanthi, बंगलुरु आणि पणजी झोनमधील बँका बंद राहणार
12 डिसेंबर : पा तोगम नेंगमिन्जा संगमा याबाबत शिलांग मध्ये बँकांच्या शाखा बंद राहतील.
17 डिसेंबर : लूसूंग, नामसुंग च्या औचित्याने गंगटोक मध्ये बँक बंद राहतील.
18 डिसेंबर : लूसूंग, नामसुंग मुळे या दिवशी गंगटोक बरोबरच शिलांग बँक शाखाही बंद राहील.
19 डिसेंबर : गोवा लिबरेशन डे च्या औचित्यावर पणजी झोन बँक शाखेला सुट्टी असेल.
24 डिसेंबर : क्रिसमस फेस्ट मुळे आइजॉल आणि शिलांग मध्ये सुट्टी राहील.
25 डिसेंबर : क्रिसमस मुळे देशाच्या जवळपास सर्व झोनमधील बँकांना सुट्टी राहील.
26 डिसेंबर : क्रिसमस फेस्ट मुळे शिलांग झोनमध्ये बँकांमध्ये काम होणार नाही.
30 डिसेंबर : यू कियांग नांगबाह मुळे शिलांग झोनमधील बँकांना सुट्टी राहील.
31 डिसेंबर : नवीन वर्षाच्या पूर्व संध्येला आइजॉल झोन मध्ये बँक बंद राहतील.
हे लक्षात ठेवावे लागेल की, 25,26 आणि 27 डिसेंबर ला सलग तीन दिवसापर्यंत देशाच्या जवळपास सर्व झोनमध्ये बँका बंद राहतील. 25 डिसेंबर ला शुक्रवार असल्याने बँकांमध्ये सुट्टी राहील. 26 डिसेंबर चौथा शनिवार आणि 27 डिसेंबर ला रविवार असल्याने बँक बंद राहील.