छत्रपती संभाजीनगर : विभागात 18 साखर कारखाने गाळप हंगामासाठी सज्ज, 4 कारखाने राहणार बंद

छत्रपती संभाजीनगर : यंदाच्या गाळप हंगामासाठी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केला आहे. येत्या 15 नोव्हेंबरनंतर या कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू होणार असून बीड जिल्ह्यातील दोन, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रत्येक एका कारखान्याचे गाळप यंदा बंद राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यांत सहकारी, खासगी असे एकूण २३ साखर कारखाने आहेत. त्यापैकी १८ कारखान्यांनी प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाकडे यंदा गाळपासाठी परवानगी मागितली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामधील सिद्धेश्वर सहकारी, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामधील रामेश्वर सहकारी, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई सहकारी, परळी येथील वैद्यनाथ सहकारी या चार कारखान्यांनी परवाना अर्ज दाखल करण्याची मुदत संपेपर्यंत अर्ज केला नाही. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधील महेश कडा सहकारी कारखाना बंद आहे. ‘सकाळ’शी बोलताना छत्रपती संभाजीनगरचे प्रादेशिक संचालक साखर कार्यालयाचे उपसंचालक एस.एम. स्वामी, म्हणाले कि, कारखान्यांकडून गाळप परवाना अर्ज प्राप्त झाला, तो मंजूर झाल्यानंतर 15 नोव्हेंबरनंतर कारखाने सुरू करता येणार आहेत.

साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here