छत्रपती संभाजीनगर : श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन व गळीत हंगामाचा शुभारंभ श्री संत एकनाथ सचिन घायाळ शुगर पैठण कारखान्याचा गळीत हंगाम २०२४-२५ चा बॉयलर अग्निप्रतिदन सोहळा नाथमंदिर संस्थानचे माजी कार्यकारी विश्वस्त नंदलाल मोहनलाल लाहोटी व त्यांच्या पत्नी सरलाताई लाहोटी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी हभप शिवाजी महाराज यांची उपस्थिती होती. चेअरमन सीए सचिन घायाळ म्हणाले की, कारखाना गळीत हंगाम सुरु करण्यास सज्ज झालेला असून गळीत हंगाम २०२४-२५ करिता ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेला १२ कोटी रुपयांचा अॅडव्हान्स वाटप केलेला आहे.
पैठण तालुक्यातील प्रत्येक गावात ऊसतोड यंत्रणा कार्यान्वित राहील. तसेच हार्वेस्टरची वाहने खाली करण्याकरिता नवीन ६० टनी क्षमतेचे ट्रिपलर बसवण्यात आले आहे. त्यामुळे कारखान्याचे प्रतिदिन ३००० मे. टन गाळप होणार आहे. तसेच कारखान्याने २७०५ रुपये प्रति मे. टन असा उच्चांकी भाव दिला. याप्रसंगी संचालक विक्रम घायाळ, दत्तात्रय आमले, डिगू गोर्डे, कचरु बोबडे, आबासाहेब मोरे, एकनाथ नवले, भाऊसाहेब पिसे, दत्तात्रय वाकडे, सुखदेव थोरात, दीपक फांदाडे, भरत घायाळ, गणेश घायाळ, रामेश्वर घायाळ, कैलास तुपकरी, रविंद्र बोडखे, अनिल घोडके, विनोद तांबे, मनोज पेरे, राखीताई परदेशी, प्रकाश बानाळे, अशोक एरंडे, बबन नवले, बाबासाहेब बोबडे, बाबासाहेब गिरग, विजय बोबडे, कैलास फासाटे, राजू बोबडे, राजु मोहिते, राजेंद्र नवथर, शिवनाथ उघडे, पाशा मंजन, वसंत टावरे, दादासाहेब लिपाने, महेश पवार, गणेश पवार आदी उपस्थित होते.