छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील धामोरी बुद्रुक येथील मुक्तेश्वर साखर कारखान्याने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ४,१३० शेतकऱ्यांना ७०० क्विंटल ५३ किलो साखर वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर वाटप केंद्राचे उद्घाटन मंगळवारी (ता. २२) करण्यात आले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हायचेअरमन किरण पाटील डोणगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर नीळ, सखाराम मोरे, पंडित गोरडे, किरण सरोदे, प्रमोद काळे, ताराचंद शिंदे, विलास सूर्यवंशी, संजय शिंदे, नितीन बोरुडे, संतोष कुंदे, विठ्ठल टेके, संदीप उगले आदी उपस्थित होते.
मुक्तेश्वर शुगरतर्फे ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर साखर वाटप सुरू असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मराव गाडे, मुख्य शेतकी अधिकारी नंदकुमार कुंजर यांनी दिली. कारखान्याचे ज्येष्ठ संचालक रामचंद्र निरपळ म्हणाले की, कारखान्याने शेतकऱ्यांचा अतिरिक्त ऊस अडचणीच्या काळात नेऊन सहकार्य केले आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी मुक्तेश्वर कारखान्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून यंदाच्या गळीत हंगामात मोठ्या प्रमाणावर ऊस देवून हंगाम यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी धनाजी शिंदे, विष्णू शेळके, नारायण शेळके, दिपक शेवाळे, शंकर टेके, व्यंकटेश बँकचे लक्ष्मण दारुंटे, सुदर्शन गायकवाड, मुख्याध्यापक बापूसाहेब पानकडे, दादासाहेब काळे, विजय ठोळे, विजय जाधव, अंकुश कर्जुळे, शंकर काळे, संभाजी काकडे, किरण जोशी, दामोधर काळे, पोपट मोरे, नंदू मिसाळ, नीलेश सावंत, अरीफ शेख आदी उपस्थित होते.