छत्रपती संभाजीनगर : ड्रेनेजच्या पाण्यावर पिकवला ऊस, बहरल्या शेकडो एकर फळबागा !

छत्रपती संभाजीनगर : वाळूज परिसरात शहरातून वाहणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्यावर शेती चांगली बहरली आहे. विद्युत मोटारपंपाद्वारे पाण्याचा उपसा करून फळबाग, ऊस आणि जनावरांसाठी गवत पिकविले जात आहे. सध्या सगळीकडे जलस्रोत आटले आहेत. तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना शहरालगतच्या काही गावांत मात्र ड्रेनेजच्या पाण्यावर शेती बहरली आहे. नाल्याच्या दोन्ही काठावर शेती असलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी शेकडो विद्युत मोटार पंप नाल्यामध्ये टाकले आहेत. त्यातून उपसा केल्या जाणाऱ्या सांडपाण्याची शेतीला मदत झाली आहे.

शहरातील सांडपाणी वाळूज, वळदगावमार्गे वाहते. या पाण्याची दुर्गंधी सुमारे अर्धा किलोमीटर परिसरात आहे. मात्र, नाल्यातील पाणी पंपाद्वारे उपसा करून ते शेतातील पिकांना देण्यात येते. वळदगाव, धामोरी वाळूज परिसरातील नाल्याकाठचे शेतकरी या पाण्यावर शेती करतात. शेतकऱ्यांनी मोसंबीच्या बागा लावल्या आहेत. काहीजण भाजीपाला पिकवितात. जनावरांसाठी हिरवा चारा पिकवतात. बंद ड्रेनेजलाइनच्या पाइपमध्ये चोकअप होऊ नये, नवीन जोडणी देता यावी यासाठी ठिकठिकाणी चेंबर आहेत. येथून पाण्याचा उपसा करून शेतासाठी वापर केला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here