छत्तीसगढ: ऊस शेतीसाठी ३० हजार बोअरवेल उपसताहेत पाणी

अंबिकापूर : ऊस शेतीमुळे सरगुजा विभागातील शेतकरी मालामाल झाले आहेत. मात्र, ऊस पिकवण्यासाठी सुरू असलेल्या बोअरवेल्समुळे सूरजपूर आणि बलरामपूर जिल्ह्याच्या अनेक गावात भूजल स्तर २५० फुटांच्या खाली गेला आहे. एक दशकापूर्वी येथे १०० फूट खोलीवर बोअरवेलला पाणी मिळत होते. शेतकऱ्यांनाही शेतीसाठी पुरेसे पाणी होते. मात्र, आता दोनशे फुटांखाली पाणी मिळणे कठीण बनले आहे. दहा वर्षात पाणी शंभर फूट खोल गेले आहे. त्यादरम्यान ऊस शेती गतीने वाढली. केरतामध्ये साखर कारखाना सुरू झाल्यानंतर जवळपास १२ हजार शेतकरी ऊस शेती करतात. सर्व शेतकऱ्यांकडे ऊस शेतीसाठी सरासरी दोन ते तीन बोअरवेल आहेत.

दैनिक भास्कमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या भागात ऊस शेतीसाठी जवळपास ३० हजार बोअरवेल्स आहेत, जे उन्हाळ्यात मार्च ते जूनपर्यंत सुरू राहतात. या दहा वर्षात जवळपास तीन हजार बोअरवेल्स बंद पडले आहेत. काही शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी दोन ते तीनदा बोअरवेलसाठी खुदाई करावी लागली आहे. राजपूर भागातील धंधापूर आणि रेवतपूरमध्ये ३७५ शेतकरी असून ते जवळपास एक हजार एकरमध्ये ऊस पिकवतात. येथे जवळपास ४०० बोअरवेल आहेत. काही ठिकाणी ५० मिटर अंतरावर त्याची खुदाई केली आहे. खडगवा येथील शेतकरी उत्तम जायस्वाल यांनी सांगितले की, पूर्वी १०० फूट खोलीवर पाणी होते. आता किमान १५० फूटांवर पाणी लागते. जलस्तर सातत्याने घटत जात आहे. त्यामुळे सरकार ठिबक सिंचनावर भर देत आहे. तर पारंपरिक सिंचनापेक्षा २५ टक्के पाण्यावर शेती केली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here