रायपूर : युनिटी इंडस्ट्रीज आणि सुरुची फूड्सने छत्तीसगढमध्ये न्युट्रिशन सप्लिमेंट, फोर्टिफाइड राइस, इथेनॉल आणि पॉवर प्लांट उभारणीसाठी २९५ कोटी रुपये गुंतवणूक करण्याची योजना तयार केली आहे.
छत्तीसगढ सरकारने प्लांट्स स्थापन करण्यासाठी दिल्लीतील या दोन कंपन्यांसोबत सामंजस्य करारावर (एमओयू) सह्या केल्या आहेत. युनिटी इंडस्ट्रीजमध्ये मक्का, खराब तांदूळपासून इथेनॉल उत्पादन करण्यासाठीच्या एका करारावर स्वाक्षरी केली आहे. केंद्र सरकारने धान्यावर आधारित इथेनॉल डिस्टिलरी उभारणे आणि सध्याच्या डिस्टिलरीचा विस्तार करण्याच्या योजनेसही मंजुरी दिली आहे. सुरुची फुड्सने पूरक पोषण उत्पादने, फोर्टिफाइड तांदळाच्या उत्पादनासाठी एका करारावर स्वाक्षरी केली आहे. यामध्ये कंपनी जवळपास १११.७ कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.