रायपूर : छत्तीसगडमधील कवर्धा येथे या वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत इथेनॉल प्लांट सुरू होण्याची शक्यता आहे. पीपीपी तत्वावर आधारित सुरू होणारा हा राज्यातील पहिलाच इथेनॉल प्लांट आहे. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, भोमरदेव साखर कारखान्याजवळील हा प्लांट सुरुवातीला प्रती दिन ८० किलो लिटर इथेनॉल उत्पादन केले जाणार आहे. यासाठी जागतिक पातळीवर निविदा काढण्यात आल्यानंतर भोरमदेव को-ऑपरेटिव्ह साखर कारखाना आणि एनकेजे बायोफ्युएल यांच्यामध्ये करार करण्यात आला होता.
हंगामामध्ये ऊसापासून आणि बिगर हंगाम कालावधीत रसापासून इथेनॉल उत्पादन केले जाईल. पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिश्रणासाठी केंद्र सरकारने सैद्धांतिक मंजुरी दिली आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, इथेनॉल उत्पादनातून राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. कवर्धा जिल्ह्यात ३०,००० हेक्टर क्षेत्रावर ऊस शेती केली जाते.