रायपूर : छत्तीसगढमधील पहिला इथेनॉल प्लांट पब्लिक-प्रायव्हेट-पार्टनरशिप (पीपीपी) मॉडेल अंतर्गत स्थापन केला जात आहे. कबीरधाम जिल्ह्यातील भोरमदेव सहकारी साखर कारखान्यात छत्तीसगढचा पहिला इथेनॉल प्लांट उभारला जात आहे. याच्या उभारणीत गती आली आहे, असे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितले.
ते म्हणाले की, या कृषी आधारित इथेनॉल प्लांटचा समावेश सरकार आपल्या प्राधान्यक्रम असलेल्या योजनांमध्ये करेल. या प्लांटची क्षमता ८० किलो लिटर प्रतीदिन (केएलपीडी) असेल.
छत्तीसगढ सरकारने राज्याची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठीच्या योजनांमध्ये, आर्थिक आणि तांत्रिक भागिदारीसाठी खासगी कंपन्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक-खासगी-भागीदारी (PPP) मॉडेलअंतर्गत राज्याचा
पहिला इथेनॉल प्लांट स्थापन केला जाईल. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी दावा केला की, PPP मॉडेल अंतर्गत स्थापन होणारा हा देशातील पहिला इथेनॉल प्लांट आहे.
भोरमदेव सहकारी साखर कारखाना आणि छत्तीसगढ डिस्टिलरीची सहाय्यक कंपनी एनकेजे बायोफ्युएल यांदरम्यान एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.
चीनीमंडीशी बोलताना भोरमदेव सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक भूपेंद्र कुमार ठाकूर म्हणाले की, हा प्लांट पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांतच सुरू होईल अशी शक्यता आहे. यातून स्थानिक लोकांनाही रोजगार मिळणार आहे.