मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली इथेनॉल प्लांटची पाहणी

मुजफ्फरपूर : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुजफ्फरपूरमधील बेला येथे लेदर पार्क आणि मोतीपूरमध्ये इथेनॉल प्लांटची पाहणी केली. उपस्थित अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. मोतीपूर येथील इथेनॉल प्लांटची पाहणी करताना त्यांनी शंकांचे निरसन करून घेतले. अन्य योजनांविषयीही चर्चा झाली. राज्यात कसा चांगल्या प्रकारे विकास सुरू आहे ते सर्वजण पाहात आहेत, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, बेला औद्योगिक प्लांटमध्ये जिविका दीदी यांनी मुलांच्या शिक्षणासाठी प्ले स्कूल आणि रेसिडेन्शिअल स्कूल सुरू करण्याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. नितीश कुमार यांनी बेलामधील लेदर पार्कची व तेथील उत्पादनांची पाहणी केली. जिविका दीदी यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. त्यावेळी दीदींनी काही अडचणी मांडल्या. याबाबत त्यांच्या निवासस्थानाचे भाडे माफ करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. आमचे सरकार बिहारच्या लोकांना सुविधा देण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न करीत आहे, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here