मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात लॉकडाउनची इच्छा नाही, पण….

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे संक्रमण गतीने होत आहे. राज्याची राजधानी मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने राज्य सरकारच्या चिंता वाढवल्या आहेत. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ८ हजार ६२३ नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईत एक हजाराहून अधिक रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन करण्याची आमची कोणतीही इच्छा नाही. पण मजबूरी हा खूप मोठा शब्द आहे. मी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी लोकांशी संवाद साधला आहे. मास्क वापरा आणि लॉकडाउन टाळा असे सांगितल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा लॉकडाउनची भीती मुंबईकरांना सतावत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जर लोक मास्क वापरणार नसतील तर लॉकडाउन करावे लागेल असे स्पष्ट केले आहे. लोकांनी मास्क वापरला तर याची गरज पडणार नाही. सद्यस्थितीत कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
पुणे शहरात नाइट कर्फ्यू १४ मार्चपर्यंत वाढविण्यात आला आहे. शाळा, कॉलेज आणि कोचिंग इन्स्टिट्यूट पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच अमरावती आणि नागपूरमध्येही लॉकडाउन करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेनेही शहरात कोरोनाबाबतचे निकष अधिक कडक केले आहेत. कोरोनाच्या निर्देशांचे जर पालन केले नाही तर पुन्हा लॉकडाउन केले जाईल असा इशारा सरकारने मुंबईकरांना दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here