लखनऊ: उत्तर प्रदेश राज्य साखर निगम लि. च्या नव्या स्थापन केलेला मुन्डेरवा साखर कारखाना, जिल्हा बस्ती तसेच पिपराईच साखर कारखाना, जिल्हा गोरखपूर मध्ये नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सल्फरलेस प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उद्या (दि.9 डिसेंबर) दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान करण्यात येणार आहे.
या साखर कारखान्यांचे लोकार्पण गेल्या वर्षी करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांकडून तेव्हा ही घोषणा करण्यात आली होती की, दोन्ही साखर कारखान्यांमध्ये सल्फरलेस साखरेचे उत्पादन करुन चांगल्या दर्जाची साखर बनवली जाईल, ज्याच्या विक्रीतून शेतकर्यांचे उसाचे पैसे भागवण्यात सुविधा होईल.
उल्लेखनीय आहे की, पिपराइच तसेच मुन्डेरवा साखर कारखान्यांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या सल्फरलेस प्लांटची स्थापना सरकारी साखर कारखान्यांमध्ये पहिल्यांदाच शासनाकडून प्राप्त झालेल्या आर्थिक सहकार्यातून करण्यात आली आहे. ही योंजना वेळेपूर्वी पूर्ण करुन गाळप हंगाम 2020-21 चा शुभारंभ सल्फरलेस साखरेच्या उत्पादनाबरोबरच केला जात आहे.
पिपराईच तसेच मुन्डेरवा साखर कारखान्यांकडून गेल्या गाळप हंगामात 45.33 लाख कु. तसेच 44.18 लाख कु. उसाचे गाळप करुन क्रमश: 4.43 लाख कु. तसेच 4.02 लाख कु. साखरेचे उत्पादन करण्यात आले.