लखनऊ: उत्तर प्रदशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी आपल्या प्रदेशातील मजुरांना देशभरामध्ये लॉकडाउन दरम्यान अडकण्यापासून वाचवण्यासाठी सोयी सुविधा प्रदान करण्याची घोषणा केली. बसमधून या प्रवासी मजुरांना आणण्याची व्यवस्था केली. उत्तर प्रदेशने सर्वप्रथम आपल्या प्रवासी मजुरांना पुन्हा परत आणण्यासाठी बसची सोय केली.
त्यांचे हे कार्य पाहून पंजाब, हरियाणा, कर्नाटक आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना या मजुरांना परत बोलवण्यासाठी अर्ज केला, जेणेकरुन लॉकडाउन उठल्यानंतर त्यांच्या राज्यात कर्मचार्यांची कमी होवू नये आणि आर्थिक व्यवहार सुरळीत असावेत. त्यांनी योगी आदित्यनाथ यांना सांगितले की, ते या मजुरांसाठी सर्व व्यवस्था करायला तयार आहेत.
एमएसएमई मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी सांगितले की, एक महिन्यापूर्वी योगीजीयांनी कृषि उत्पन्न आयुक्त अलोक सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली. या समितीचा हेतू प्रवासी मजुरांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्याचा होता. आम्हाला जे लक्ष्य दिले आहे, ते जवळपास 15 लाख नोकर्यांचे आहे, एकट्या माझ्या विभागात पाच लाख नोकर्यांचे लक्ष्य बनवायचे आहे.
तीन आठवड्यांनंतर आदित्यनाथ यांनी प्रवासी मजुरांना परत घरी आणण्याचा आदेश दिला होता. आतापर्यंत 6.5 लाख प्रवासी परत आले आहेत. आम्ही इंडस्ट्रि चे प्रमुखांचा रोजगार वाढवण्यावर जोर दिला, जेणेकरुन प्रवासी मजुरांना कोणतीही अडचण येणार नाही. कोरोना शी आपल्याला मोठा संघर्ष करायचा आहे. यासाठी आमचे लोक कामासाठी बाहेर जावू नयेत असे आम्हाला वाटते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.