बुलावायो :झिम्बाब्वे मधील टोकवेमुकोर्सी बंधार्यामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबातील शालेय मुलांनी ऊसाने भरलेली ट्रेड थांबवून ऊसाची चोरी केली आहे. या ऊसाला गाळपासाठी नेण्यात येत होते. झिम्बाव्वे च्या राष्ट्रीय रेल्वे नुसार शालेय मुलांवर ट्राइंगलमधील टोंगाट हुलेट साखर कारखान्यांसाठी नेण्यात येणार्या ऊसाला चोरल्याचा आरोप आहे. काही पालकांवरही आपल्या मुलांबरोबर गाड्या लुटल्याचाही आरोप करण्यात आला आहे. धावत्या मालगाडीतून ऊस चोरताना काही मुले जखमी झाली आहेत.
ऊसाची होणारी चोरी पाहता, गेल्या सप्ताहात झिंम्बाव्वे रेल्वेने या क्षेत्रामध्ये जागरुकता अभियान राबवले होते. ते म्हणाले की,आम्हाला चिंगविजी मध्ये महिला आणि मुलांना सांभाळणे अवघड झाले आहे. कारण बऱ्याच साखर कारखान्यांची ऊसाची रेल्वे याच मार्गावरुन जाते.
Newzimbabwe.com बरोबर एका साक्षात्कारात राष्ट्रीय रेल्वे ऑफ झिम्बाब्वे चे जनसंपर्क प्रबंधक न्याशा मरावणिका म्हणाले की, गेल्या शुक्रवारी आम्ही टोंगाट हुलेट अधिकार्यांबरोबर स्थानिक नेत्यांच्या बैठकीत ऊस चोरीचा मुद्दा तडीस नेण्याच्या दृष्टीने जागरुकता बैठक देखील केली. बैठकीत मरावणिका म्हणाले, आम्हाला असे समजले की, काही पालक आपल्या मुलांना गाडीमधील ऊस चोरण्यासाठी पाठवत होते. यामध्ये एका मुलाला आपला पाय गमवावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले. या चोरीचे मुख्य कारण भूक आहे. आणि आपण ही भूक दडपू शकत नाही. रेल्वेवर दगड मारणे आणि ऊस चोरण्याची घटना खूपच चिंताजनक असल्याचे मरावणिका यांनी सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.