चीन : म्यानमारमधील साखरेचा साठा गोदामांमध्ये पडून आहे. म्हणूनच, म्यानमार साखर उत्पादन कमी करण्याचा विचार करीत आहे. साखर कमी करण्यासाठी साखर आयातीला उत्तेजन देण्याच्या दृष्टीने म्यानमारचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, चीन, म्यानमारसाठी एक आशेचा किरण घेवून आला आहे.
म्यानमारमधील साखरेची गुणवत्ता, साखर कारखाने आणि गोदामांचे निरिक्षण करण्यासाठी चीनचे अधिकारी आक्टोबरमध्ये म्यानमारच्या दौर्यावर येतील. जर सर्व काही व्यवस्थित असेल तर चीन, म्यानमारकडून साखर विकत घेऊ शकेल.
2015 ते 2017 च्या मध्यापर्यंत चीन म्यानमारच्या साखर आयात करणार्यांपैकी एक होता. परंतु चीनने साखर आयात करण्यास बंदी घातल्यानंतर, लगेचच म्यानमारमध्ये साखर अधिशेष वाढला.
चीनला साखरेची निर्यात बंद झाल्यापासून देशात किंमती खाली आल्या आहेत. स्थानिक साखर व्यापारी चिनी मार्केटवर अवलंबून न राहता इतर पर्यायांची मागणी करत आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.