नवी दिल्ली : अमेरिकेशी सुरू असल्या व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनने भारतासोबत नरमाईची भूमिका घेतली आहे. भारताच्या व्यापार धोरणाचा आंम्ही सन्मान करत असून, दोन्ही देशांदरम्यान व्यापार संबंधात काही वादाचे मुद्दे असतील तर, ते दूर करण्याचा आंम्ही प्रयत्न करू, असेही चीनने स्पष्ट केले आहे. जागतिक व्यापारातील मक्तेदारी आणि संरक्षणवादाच्या विरोधात चीनला भारताची मदत हवी आहे. त्यामुळेच चीनने भारताकडून मदतीची अपेक्षा केली आहे. चीनचे भारतातील नवनिर्वाचित राजदूत सन वायडूंग म्हणाले, ‘व्यापार असमतोलाबद्दल भारताने व्यक्त केलेली चिंता आंम्हाला मान्य आहे. पण, मला हे नमूद करावेसे वाटते की, चीनने कधीही भारताशी व्यापाराबाबत जाणीवपूर्वक स्पर्धा केली नाही.’ भारतातून मोठ्या प्रमाणावर तांदूळ आयात करण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत. तसेच भारताकडून कृषी मालाची होत असलेली आयात गेल्या वर्षभरात दुप्पट झाल्याचेही सन यांनी सांगितले.
यंदाच्या हंगामात चीन भारताकडून साखर आयात करण्यास उत्सुक होता. पण, यात पाकिस्तानने बाजी मारली. चीनचे शिष्टमंडळ भारतात येऊन साखर कारखान्यांना भेटी देऊन गेले होते. पण, त्यानंतरही चीनकडून ३ लाख टन साखरेची ऑर्डर घेण्यात पाकिस्तान यशस्वी ठरला. चीनमध्ये सध्या ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटल्यामुळे त्याचा परिणाम साखरेच्या उत्पादनावर झाला आहे. चीनसाठी तो चिंतेचा विषय आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.