चीनने 2020 साठी 1.95 दशलक्ष टन साखर आयात कोटा निर्धारित केला

बीजिंग : चीन आपल्या देशातील साखरेची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आयातीवर अवलंबून राहिला आहे. देेशाच्या वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, 2020 साठी साखर आयात कोटा 1.945 दशलक्ष टन निर्धारित केला आहे.  वाणिज्य मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार, साखरेचा एकूण आयात कोट्यामधून 70 टक्के राज्याच्या स्वामित्व असणार्‍या फर्मसाठी वाटप करण्यात येईल.

कोट्यासाठी अर्ज करणार्‍या कंपन्यांनी 2018 मध्ये प्रतिदिवशी 600 टन कच्च्या साखरेवर प्रक्रिया केली असावी, किंवा वर्षात 450 दशलक्ष युआन पेक्षा अधिक किंमतीची साखर विक्री केली असावी.  अलीकडेच, भारत-चीन व्यापार बैठकीच्या वेळी, चीनने भारताबरोबर 50,000 टन कच्ची साखर खरेदीसाठी सामंजस्य करारावर सह्या केल्या आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here