बिजिंग : कृषी आणि ग्रामीण व्यवहार मंत्रालयाच्या एका रिपोर्टनुसार ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत चीनमधील साखर उत्पादन ९ मिलियन टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मंत्रालयाने साखरेच्या कृषी पुरवठा आणि मागणीबाबत रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टनुसार गेल्या महिन्यात जारी करण्यात आलेल्या पुर्वानुमानापेक्षा हे अनुमानीत उत्पादन ३,३०,००० टन कमी आहे.
मासिक विश्लेषण रिपोर्टनुसार, दक्षिण चीनच्या गुआंग्शी झुआंग स्वायत्त क्षेत्रामध्ये कमी ऊस उत्पादनामुळे अनुमान घटविण्यात आले आहे. अहवालात म्हटले आहे की, साखर बाजारपेठेत साखरेच्या किमती या वर्षी मार्च महिन्यात केलेल्या ५६५० – ६२०० युआनच्या पूर्वानुमानापेक्षा वाढून ५९५० युआन (जवळपास ८६३.८ अमेरिकन डॉलर) ते ६५५० युआनपर्यंत वाढतील. अहवालात साखरेचे उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील निर्यातीच्या स्थितीमुळे देशांतर्गत साखरेच्या बाजारपेठेवर परिणामांबाबत माहिती देण्यात आली आहे.